Home अमरावती खळबळजनक: इंजिनिअर तरुणीची हत्या, प्रियकर गंभीर

खळबळजनक: इंजिनिअर तरुणीची हत्या, प्रियकर गंभीर

एका कॉलेज कन्येचा हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह आढळून आला तसेच तिच्या शेजारी जखमी अवस्थेत तरुण आढळून आला.

Engineer girl Murder lover serious

बडनेरा | अमरावती: लगतच्या सुपर एक्सप्रेस हायवेलगत एका कॉलेज कन्येचा मृतदेह आढळून आला. तर तिच्याशेजारी एक तरूण गंभीर जखमी स्थितीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघड झाली असून, बडनेरा पोलिसांनी तुर्तास सखोल चौकशी चालविली आहे. पोलिसांच्या मते ती घटना एकतर्फी प्रेमातून घडली असावी, मात्र, जखमी तरूणाने कुणीतरी आपल्यासह आपल्या प्रेयसीवर हल्ला केल्याचे बयान दिले आहे. त्यामुळे पोलीस सध्या कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेली नाही.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, एसीपी दत्तात्रय ढोले यांच्यासह बडनेराचे ठाणेदार नितीन मगर हे घटनास्थळी पोहोचले असून, तेथून दोघांचेही मोबाईलव मुलाची दुचाकी जप्त करण्यात आले. तर गंभीर जखमी तरूणाला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस सुत्रानुसार, संजना शरद वानखडे (कांडली, परतवाडा) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर जखमी तरूणाचे नाव सोहम गणेश ढाले (रा. तुळजापूर गांधी, ता. चांदूरबाजार) असे असल्याचे समोर आले आहे. दोघेही न्यु राम मेघे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आयटी फस्ट इअरचे विदयार्थी आहेत. दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते, अशी माहिती त्या दोघांच्या क्लासमेटनी पोलिसांनी दिली आहे.

एक युवक, युवती गंभीर अवस्थेत वडुरा गावालगत पडले असल्याची माहिती पहाटे सहाच्या सुमारास बडनेरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले असता, तरूणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर जखमी तरूण पाणी व अॅम्बुलन्स बोलावा, अशी आर्जव करताना मरणासन्न आढळून आला. दोघांच्याही गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राचे घाव आहेत. दोघेही साईनगर परिसरात भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जखमी तरूणाचे प्राथमिक बयान नोंदविले गेले असून आपण आज पहाटे ब्रेकअपसाठी शेवटचे भेटायचे ठरविले होते, त्यानुसार आपण न्यु एक्सप्रेस हायवेवर पोहोचलो. तेथे बोलत असताना दोन अज्ञातांनी आमच्यावर हल्ला केला, एकाचवेळी हल्ला केल्याने आपण प्रतिकार करू शकलो नाही, असे त्याने बयानात म्हटले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: Engineer girl Murder lover serious

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here