Home अहमदनगर अहमदनगर: दुचाकी तपासली अन् आढळले पिस्टल, काडतुसे

अहमदनगर: दुचाकी तपासली अन् आढळले पिस्टल, काडतुसे

Ahmednagar Crime News: पोलिस तपासात विना क्रमांकाच्या दुचाकीत एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसे सापडली, दोघांना अटक व इतर आरोपी पसार.

the bike was checked and the pistol, cartridges were found Crime Filed

जामखेड  | Jamkhed : लहान मुलांना आठ जण मारहाण करत होते. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्याला चाकूने व वस्ताऱ्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत दाखल फिर्यादीवरून पोलिस तपासात विना क्रमांकाच्या दुचाकीत एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली.

याबाबत जामखेड पोलिसांत दिलीप गायकवाड (वय २४, जामखेड) यांनी फिर्याद दिली. २९ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता अभिजित माने, तुषार पवार, सोमनाथ पवार, भरत जायगुडे, राहुल शिरगिरे, नामदेव शिरगिरे, तुषार ऊर्फ टी.डी. (सर्व रा. जांबवाडी, ता. जामखेड), अक्षय शिंदे (रा. खाडेनगर, जामखेड) असे सर्व जण अनोळखी तीन लहान मुलांना मारहाण करत होते. त्यांना फिर्यादी गायकवाड यांनी आहेत. थांबविण्याचा प्रयत्न केला. भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आरोपींना आला. यावेळी अभिजित माने, तुषार पवार यांनी चाकूने व वस्ताऱ्याने मारहाण करून गायकवाड यांना जखमी केले. गायकवाड व त्यांच्या आई-वडिलांनाही घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

वरील गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती करत असताना घटनास्थळावर विना क्रमांची चावी नसलेली दुचाकी दिली. त्याच्या डिकीमध्ये पाहणी केली असता एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तुषार पवार व अक्षय शिंदे यांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती करीत

Web Title: the bike was checked and the pistol, cartridges were found Crime Filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here