Home पुणे विहिरीचे काम सुरू असताना रिंग पडून ४ मजूर गाडले

विहिरीचे काम सुरू असताना रिंग पडून ४ मजूर गाडले

Pune News: विहिरीची (Well) रिंग करण्याचे काम सुरू असताना अचानक रिंग पडून मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकल्याची घटना.

While working on the well, the ring fell and buried 4 laborers

शेटफळगढे | पुणे : विहिरीची रिंग करण्याचे काम सुरू असताना अचानक रिंग पडून मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकल्याची घटना इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, सहा पोकलेन मशीनच्या साहाय्याने माती व मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (३५), जावेद अकबर मुलानी (३५), परशुराम बन्सीलाल चव्हाण (३०), मनोज मारुती सावंत (४०, सर्व रा. बेलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी मुरुमात अडकलेल्यांची नावे आहेत.

विजय अंबादास क्षीरसागर (रा. सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचे मौजे म्हसोबावाडी गावच्या हद्दीत कवडे वस्तीलगत जमीन गट नंबर ३३८ मध्ये विहिरीचे रिंग बांधकाम सुरू होते. ही विहीर ही १२० फूट व्यासाची (गोल) व १२७ फूट खोल आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे संबंधित मजूर घरी पोहोचलेच नाहीत. त्यांना मोबाइलवर कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु तो संपर्क होऊ न शकल्याने सर्वजण म्हसोबाची वाडीत कामाच्या ठिकाणी पोहोचले.

Web Title: While working on the well, the ring fell and buried 4 laborers

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here