Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: एसटी-बुलेट दुचाकीच्या धडकेत माजी सैनिक ठार

अहमदनगर ब्रेकिंग: एसटी-बुलेट दुचाकीच्या धडकेत माजी सैनिक ठार

Ahmednagar News: एसटी बस आणि मोटारसायकल यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये मोटार सायकलस्वार माजी सैनिक जागीच ठार झाल्याची घटना, बस चालक पसार.

Ex-serviceman killed in collision with ST-Bullet Bike Accident

पाथर्डी | Pathardi:  एसटी बस आणि मोटारसायकल यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये मोटार सायकलस्वार माजी सैनिक जागीच ठार झाल्याची घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अहमदनगर – पाथर्डी रस्त्यावरील करंजी गावाजवळ घडली. भारत लक्ष्मण पागिरे (रा. आगडगाव, ता. नगर) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे  नाव आहे.

या अपघातात  बुलेट गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. याबाबत अधिक माहिती अशी की,  बुधवारी दुपारी भारत पागिरे हे करंजी येथून कासारवाडी, कासार पिंपळगाव येथे नातेवाईकाकडे गेले होते. तेथून परत करंजीकडे येत असताना करंजी गावाजवळील अपूर्व पेट्रोलपंपासमोर भिवंडी गेवराई या गेवराई डेपोच्या एसटी बसची आणि पागिरे यांच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये पागिरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर एसटी बस चालक तिथून पसार झाला.

अपघाताची माहिती समजल्यानंतर महामार्ग पोलीस पथक तसेच करंजी आऊट पोस्टचे हवालदार हरिभाऊ दळवी, लाड घटनास्थळी दाखल झाले व पागिरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना करण्यात आला.

Web Title: Ex-serviceman killed in collision with ST-Bullet Bike Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here