Home अहमदनगर संगमनेर बसस्थानकावर घडलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याला वेगळे वळण

संगमनेर बसस्थानकावर घडलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याला वेगळे वळण

Loni Crime: षडयंत्र रचून खोटा  विनयभंगाचा गुन्हा (Molestation) दाखल करून बदनामी केली.

different twist to the Sangamner bus stand molestation case

लोणी: संगमनेर बसस्थानकात घडलेल्या विनयभंग प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे समोर आले आहे. षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली म्हणून तक्रारदार महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध आहेर यांनी लोणी पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या आठवड्यात लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्याविरुद्ध एका महिलेच्या तक्रारीवरून संगमनेरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली म्हणून तक्रारदार महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध आहेर यांनी लोणी पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान या सर्व प्रकरणाच्या मुळाशी लोणी खुर्द येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीचा वाद असल्याची चर्चा आहे.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील प्रतिष्ठित कुटुंबातील किरण किसनराव आहेर यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांत गेल्या आठवड्यात एक महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. मात्र या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळते का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बुधवारी किरण आहेर यांनी लोणी पोलिसांत आपल्याविरुद्ध षडयंत्र रचून बदनामी केल्याबद्दल ‘मनीषा’ नामक महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

श्री. आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 3 जुलै रोजी माझ्या मोबाईलवर एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. मी व्हिडीओ कॉल केला असता ती महिला असल्याने मी लगेच बंद केला. मात्र या महिलेने पुन्हा मेसेज पाठवून तो चुकून आल्याचे सांगताना माझे नाव व गाव विचारले. मी सुद्धा तिची माहिती विचारली. त्यानंतर आम्ही एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि मेसेज करू लागलो. 6 जुलै रोजी तिने आडगाव येथे आपले नातेवाईक असल्याचे सांगितले. माझे पती नाशिक येथील कंपनीत तर मी खासगी रुग्णालयात नोकरी करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी तिने मला कॉल करून पतीची संगमनेर येथे बदली झाल्याने मी नोकरी सोडली आहे. मला संगमनेर येथे नोकरी मिळवून द्या म्हणून सांगितले. आमचे कॉल सुरू राहिल्याने आमची मैत्री झाली.

25 जुलै रोजी सायंकाळी या मनीषा नामक महिलेचा मला कॉल आला व तिने लोणी खुर्द येथील पिंपरी निर्मळ रस्त्यावर मला येण्यास सांगितले. मी माझ्या एका मित्राला सोबत घेऊन तेथे गेलो. माझ्याकडे तुझे कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअ‍ॅप चॅट, फोटो आहेत. मला 15 लाख रुपये दिले नाही तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करीन म्हणून धमकी दिली. मी घाबरलो. जवळचे 25 हजार 500 रुपये तिला दिले. ती आरडाओरड करू लागल्याने बँकेचा 15 लाख रक्कमेचा चेक सही करून दिला.

तिने दुसर्‍या दिवशी मला संगमनेर बसस्थानकावर बोलावले. तेथे गेल्यावर तिने पैशांची मागणी केली. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. लोणी खुर्द येथील काही व्यक्तिविरुद्ध जमिनीच्या वादाची केलेली केस मागे घेण्यास सांग अन्यथा तुझ्याविरुद्ध तक्रार देईन, अशी धमकी देत राहिली. मला मारहाण केली. तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने माझा मोबाईल फोडला. आरडाओरड करून पोलिसांना बोलावले. मला शहर ठाण्यात नेऊन माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली.

मूळची मनमाड येथील व हल्ली पाथर्डी फाटा, नाशिक येथे राहणारी ‘मनीषा’ नामक महिला व तिच्या साथीदारांनी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून माझी बदनामी केल्याप्रकरणी माझी तक्रार दाखल करावी, असे आहेर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.र.नं. 450/23 भादंवि कलम 388, 389, 504, 506, 323, 120ब, 420, 500, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणाच्या मागे नेमके कारण काय आहे हे शोधून काढणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

Web Title: different twist to the Sangamner bus stand molestation case

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here