विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच नावे जाहीर, पंकजा मुंडेना वगळले, तर नगर जिल्ह्यातून
मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. (BJP announces five names for Legislative Council) या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं.
मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश केलेला नाही आणि पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत उमा खापरे यांच्या नावाचा समावेश करुन सर्वांनाच भाजपने एक झटका दिला आहे. नगर जिल्ह्यातील राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपने जाहीर केलेली पाच उमेदवारांची नावे:
प्रवीण दरेकर,
राम शिंदे,
श्रीकांत भारतीय,
उमा खापरे,
प्रसाद लाड
Web Title: BJP announces five names for Legislative Council, excluding Pankaja Munde Ahmednagar Ram Shinde