Home अहमदनगर Rape | लोणी येथे एका हॉटेलमध्ये महाविद्यालयीन तरुणीला ब्लॅकमेल करून बलात्कार

Rape | लोणी येथे एका हॉटेलमध्ये महाविद्यालयीन तरुणीला ब्लॅकमेल करून बलात्कार

College girl rape by blackmail in hotel

Ahmednagar |  लोणी:  इन्स्टाग्रामवर मैत्री करून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना समोर आली आहे. लोणीमधील एका हॉटेलमध्ये या तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.  याप्रकरणी बीड जिल्ह्यातील मजुरी करणारा विवाहित तरुण लोणी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

सप्टेंबर २०२१ पूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या तरुणाने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीशी मैत्री करण्यासाठी लोणी गाव निवडले. लोणीच्या बसस्थानकावर त्यांची भेट झाली. लोणीतल्याच एका हॉटेल मध्ये तिला नेऊन तिचे फोटो काढले. फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून सप्टेंबर ते डिसेंबर चार महिने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

मुलीने मात्र आपल्या घरी ही गोष्ट सांगितली नाही. मात्र या तरुणाने विवाहित असूनही मुलीच्या वडिलांना फोटो पाठवून तिच्याशी लग्न करण्यासाठी धमक्या दिल्या. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्याविरुद्ध लोणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गायके, वय -२५ रा.लोणगाव ता.माजलगाव जि. बीड याचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्याला बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद येथून अटक केली. त्याच्या विरुद्ध पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: College girl rape by blackmail in hotel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here