Home अकोले राजूर : भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उंचावला

राजूर : भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उंचावला

राजूर : भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उंचावला

राजूर (ललित मुतडक): भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उंचावला असुन इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे.त्यामध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे यांनी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती अकोले (शिक्षण विभाग) आयोजित बाल आनंद मेळावा रणद बु.येथे उद्घाटनप्रसंगी केले. 
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अहमदनगर चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे हे होते तर यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर,सरपंच अंजनाताई कोरडे,मंगळा पटेकर,पांडुरंग ईदे,संतोष देशमुख, गणपत पटेकर,बी.के.जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.आधुनिक युगासोबत शिक्षण पद्धती बदलली असून परिवर्तन घडतेय जिल्हा परिषदेच्या गुणवत्तेमुळे मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे.आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारी ज्ञान वाढते कलागुणांना वाव मिळतो सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक प्रगती घडुन बुद्धीला चालना मिळते.असे अशोकराव भांगरे यांनी सांगितले.तर यावेळी रणद बु.च्या मराठी शाळेच्या पटांगणात विद्यार्थी नी मोठा बाजार भरविली होता.विक्री साठी रानभाज्या,वडापाव,इडली,आईस्क्रीम,भाजी भाकरी चे स्टाँल उभारण्यात आले होते. अशोकराव भांगरे याच्या सह उपस्थित मान्यवरांनी भाजी भाकरीचा आस्वाद घेत खरेदी करत विद्यार्थीनीचे मनोबल उंचावले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व केन्द्र प्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद राजुर गट यांनी विशेष परिश्रम घेतले. 
फोटो संदर्भ :-जि.प.अ.नगर चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे,सुनीता भांगरे,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर,सरपंच अंजनाताई कोरडे,मंगळा पटेकर,पांडुरंग ईदे,संतोष देशमुख, गणपत पटेकर,बी.के.जोशी.
छाया :- ललित मुतडक
पहा बातमीत:संगमनेर: ३६ लाख लुटणारे फिर्यादीच निघाले आरोपी 

Website Title: BJP Government z p school Elevated status


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here