Home अकोले डॉ. राजेंद्र प्रसाद आश्रमशाळेत लायन्स क्लब पुणे सुप्रीमच्यावतीने बालउद्यान

डॉ. राजेंद्र प्रसाद आश्रमशाळेत लायन्स क्लब पुणे सुप्रीमच्यावतीने बालउद्यान

राजूर प्रतिनिधी (ललित मुतडक):-
                  ग्रामीण  आदिवासी दुर्गम भागातील आश्रमशाळेत आज लायन्स क्लब पुणे सुप्रीमने साकारलेल्या बाल उद्यानात भविष्यात हि अदिवासी मुले खेळतील बागडतील व त्याचा शारीरिक व मानसिक विकास होऊन मन आणि शरीर सदृढ बनेल असा विश्वास लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल ला.विनोद कपूर यांनी व्यक्त केला.
    अकोले तालुक्यातील डोंगरदर्यातील आदिवासी भागातील  शेणित (ता अकोले)  गावातील  सत्यनिकेतन संचलित डॅा.राजेंद्र प्रसाद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत पुणे येथील लायन्स क्लब पुणे सुप्रीम च्यावतिने आश्रमशाळेतील मुलांसाठी शहरी भागांसारखे खेळणी बसवून सुंदर असे बाल उद्यान उभारले आहे,त्याचे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल ला.विनोद कपूर यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लब पुणे च्या अध्यक्षा ला.साै.सुनीता कुलकर्णी,ला. अशोक मिस्ञी,ला.जयंत कुलकर्णी,ला.जे.पी.जाधव,सरपंच सत्यभामा जाधव,सत्यनिकेतन संस्थेचे सह सचिव मा. मिलिंद उमराणी,संचालक प्रा.प्रकाश टाकळकर, मंगलदास भवारी,अँड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य.बाबासाहेब देशमुख, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.शिंदे सर, उपस्थित होते.
        ला.कपुर पुढे म्हणाले कि शहरातील वातावरणापेक्षा ग्रामीण भागातील वातावरण आजही सुंदर आहे .शहरी भागात आपल्या संस्कृतीला जुनी परंपरा म्हणून दुर्लक्षित केले जात असल्याने आज मुलांवरील संस्कार राहिले नाही माञ आजही ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील या शाळेत संस्काराचे धडे दिले जातात.त्यामुळे या शाळेत मुलांमध्ये चांगले विचार व संस्कृती रूजवण्याचे काम होत आहे.एखाद्या व्यक्तीच्या भावना,मन एखाद्या संस्थेशी जुळले तर काय आमूलाग्र बदल होउ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हि आश्रमशाळा व पुणे येथील लायन्स क्लब सदस्य मा.अशोक मिस्ञी अाहे असे गाैरवोदगारही त्यांनी काढली.
  यावेळी ला.अशोक मिस्ञी म्हणाले डॅा राजेंद्र प्रसाद आश्रमशाळेचा दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक आला होता.आता माझे दोन स्वप्न शाळेबाबत आहे.एक आश्रमशाळेत मुलांसाठी वस्तीगृहाची स्वतंत्र इमारत व अश्रमशाळेला राज्यात प्रथम क्रमांक मिळावा असे म्हणताना ला.मिस्ञी यांना गहिवरून आले होते.
 सत्यनिकेतन संस्थेची माहिती व इतिहास सह सचिव मिलिंद उमराणी यांनी सांगितले तर लायन्स क्लब पुणे सुप्रीम च्या उपक्रमाची माहिती ला.जयंत कुलकर्णी यांनी दिली.कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री.युवराज गभाले यांनी केले.यावेळी लायन्स क्लब पुणेचे सदस्य ला राजश्री कुलकर्णी,ला.हिमा दातार,ला भाग्यश्री भालेराव,नवले सर,चाैधरी सर,सह सर्व शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

पहा बातमीत:संगमनेर: ३६ लाख लुटणारे फिर्यादीच निघाले आरोपी 

Website Title: BJP Government z p school Elevated status


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here