Home अहमदनगर खा. डॉ. सुजय विखे यांनी गाजावाजा न करता दिल्लीवरून इंजेक्शनचा मोठा कोटा...

खा. डॉ. सुजय विखे यांनी गाजावाजा न करता दिल्लीवरून इंजेक्शनचा मोठा कोटा आणला  

BJP MP Sujay Vikhe Patil brings Remdesivir injections by private plane from Delhi

अहमदनगर | Sujay Vikhe Patil: कोरोना संकट काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगर भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला आहे. त्यांनी थेट खासगी विमान करून इंजेक्शन अहमदनगरला आणली आहे. नगरकरांसाठी ३०० इंजेक्शन आणली आहेत.

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हा कार्यक्रम केला त्यांनतर त्यांनी आज सोशियल मेडीयावर व्हिडियो शेअर करून माहिती दिली. त्यांत त्यांनी म्हंटले आहे. ही इंजेक्शन सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी राजकारण करू नये. मी मुद्दाम दोन दिवस उशिरा हा व्हिडियो अपलोड केला नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती असे सुजय विखे यांनी म्हंटले आहे.

मी गेलो फॅक्टरीत, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर करत  मदत घेऊन ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही हे मला माहित नाही. माझ्या मनात पाप नाही त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही असे विखे यांनी सांगितले.  

Web Title: BJP MP Sujay Vikhe Patil brings Remdesivir injections by private plane from Delhi to Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here