राज्यात लस मोफत का १ मे ला बोलणार मुख्यमंत्री
पुणे | Vaccine: केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे. त्या दृष्टीने राज्यसरकारने तयारी सुरु केली आहे. मात्र लोकसंख्या तुलनेत लसींचा पुरवठा कसा होतो हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
केंद्रसरकारच्या उज्वला गॅस सबसिडी योजनेप्रमाणे नागरिकांना आवाहन करणार आहोत की, ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः खर्चानी लस घ्यावी. गरिबांना आम्ही लस देऊ असा फार्मुला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविला आहे.
पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. टेंडरमध्ये सर्व कंपन्यांचा उल्लेख केला जाणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील लस मोफत संदर्भात १ मे ला मुख्यमंत्री बोलणार आहे.
Web Title: vaccine free in the state? Cm will Say