Home संगमनेर वीजबिलमाफीसाठी भाजपचे संगमनेरात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

वीजबिलमाफीसाठी भाजपचे संगमनेरात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

BJP's agitation in front of MSEDCL office in Sangamner

संगमनेर | Sangamner: शहरातील नवीन नगर रोडवरील महावितरण कार्यालयासमोर भाजपच्या वतीने १०० युनिटपर्यंत असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे यांसह अनेक मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

थकीत वीजबिल ग्राहकांची वीज खंडित करू नये, वीज खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबवावी, १०० युनिटपर्यंत असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे यांसह अनेक मागण्यांसाठी भाजपाने शुक्रवारी नवीन नगर रोड येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले.

यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असे निवेदनात म्हंटले आहे.

या आंदोलनावेळी संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष श्रीराम गणफुले, माजी नगरसेवक शिरीष मुले, काशिनाथ पावसे, किशोर गुप्ता, सोपान हासे, राजाराम लांडगे, अप्पासाहेब आहेर दादासाहेब नेहे, दीपक भगत, सुनील खरे, प्रवीण कर्पे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: BJP’s agitation in front of MSEDCL office in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here