संगमनेर तालुक्यात जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला
संगमनेर | Sangamner: संगमनेर लोणी रस्त्यावर समनापूर गावच्या शिवारात टेम्पोत जनावरे भरून कत्तलीसाठी जाणाऱ्या एकाला संगमनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडले पाठलाग करत पकडले आहे. ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी एकाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पो चालक मोहमंदएजाज इसाक सौदागर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे १२ जनावरांना जीवदान मिळाले आहे. ३ लाख रुपये किमतीचे १२ जनावरे व ६ लाख ५० हजार रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय पवार अधिक तपास करीत आहे.
Web Title: Sangamner taluka, a tempo was caught carrying animals