Home अहमदनगर तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ घालून आंदोलन

तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ घालून आंदोलन

BJP's agitation in Nagar tehsil office

अहमदनगर: नगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान, कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी, पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी या व अशा अनेक मागण्यांसाठी भाजपा नगर तालुक्याच्या वतीने नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, प्रदेश अधिकारी युवराज पोटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते,

यावेळी मनोज कोकाटे यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे. राज्यसरकार हे अत्यंत निष्क्रिय सरकार आहे. सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच आनंद वाटत आहे. राज्यात करोनाग्रस्त परीस्थिती, अतिवृष्टीमुळे अडचणीत असताना, दुध दरवाढ याबाबत सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता आर्थिक मदत द्यावी, दुध दरवाढ करावी, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.  

Web Title: BJP’s agitation in Nagar tehsil office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here