Home संगमनेर संगमनेर तालुक्यात टँकर व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

संगमनेर तालुक्यात टँकर व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

Sangamner taluka Accident tanker and bike

संगमनेर | Sangamner: सोमवारी सकाळी टँकर व दुचाकी यांच्यात अपघात झाला यामध्ये सुकेवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रहिमपूर शिवारातील ओढ्यालगत असलेल्या जोर्वे आश्वी रस्त्यावर धोकादायक वळणावर हा अपघात घडला.

अक्षय सोमनाथ गोसावी रा. सुकेवाडी असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण आश्वी येथील एका शोरूममध्ये नोकरीस होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास अक्षय गोसावी हा तरुण आपल्या मोटारसायकलवरून आश्वीकडे येत होता. यावेळी समोरून येणाऱ्या टँकरने अक्षयच्या दुचाकीला सामोरासमोर धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच रहिमपूरचे कामगार पोलीस पाटील आबासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अक्षयला रुग्णवाहिकेद्वारे संगमनेर येथे दाखल करण्यात आले होते. अक्षयच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. या घटनेने गावात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Sangamner taluka Accident tanker and bike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here