Home क्राईम अनैतिक संबंधाच्या धमकीतून महिलेची आत्महत्या

अनैतिक संबंधाच्या धमकीतून महिलेची आत्महत्या

Woman commits suicide

राहता: अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात महिलेने टोकाची भूमिका घेत आपले जीवन संपविल्याचा प्रकार घडला आहे.

अनैतिक संबंधाबाबत विवाहित महिलेस आम्ही तुझी बदनामी करू अशी धमकी देऊन आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मयत विवाहित महिलेच्या पतीने राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार माझी पत्नी कामास असलेल्या ठिकाणी मालकाने व त्याच्याबरोबर करणाऱ्या एका व्यक्तीने मला फसविले आहे, मला सांगायला बरे वाटत नाही पण मला पत्नीने सांगितले. माझ्या कुटुंबातील एका नातेवाईक महिलेने माझ्या पत्नीस विश्वासात घेऊन चौकशी केली त्यात पत्नीच्या झालेल्या फसवणुकीबद्दल माहिती मिळाली.

आरोपी विकी शंकर बाबर व संजय गणपत सदाफळ यांनी अनैतिक संबंध करून फसवणूक केल्याने माझ्या पत्नीच्या मनात नेहमी सल राहिली. माझ्या पत्नीस आरोपी बाबर व सदाफळ यांनी दिलेल्या त्रासामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची खात्री असून माझी त्यांच्याविरोधात फिर्याद आहे. अनैतिक संबंध करून तिची समाजात बदनामी करू अशी धमकी दोन्ही आरोपीने दिल्याने तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बाबर व सदाफळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबबत अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Woman commits suicide by threatening immoral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here