Rajur News: ग्रामपंचायतमध्ये भाजपचेच बहुमत झाले.
राजूर : राजूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपचे बनसोडे यांची निवड झाली. बनसोडे यांनी मतांनी राष्ट्रवादीच्या रोहिणी माळवे यांचा पराभव केला.
राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सरपंच पुष्पा निगळे यांचा विजय झाला होता. सरपंचपद राष्ट्रवादीकडे गेले असले तरी
ग्रामपंचायतमध्ये भाजपचेच बहुमत झाले होते. सतरा सदस्यांपैकी भाजपचे अकरा उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे उपसरपंचपद भाजपकडेच राहणार होते. भाजपकडून उपसरपंच पदासाठी संतोष बनसोडे यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षल नंदकुमार मुतडक आणि रोहिणी नंदकुमार माळवे या दोघांनी अर्ज भरले होते. माघारीच्या वेळी हर्षल मुतडक यांनी माघार घेतल्यामुळे बनसोडे आणि माळवे यांच्यात सरळ लढत झाली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या अकरा संतोष अकरा विरुद्ध सात उमेदवारांनी बनसोडे यांना एकनिष्ठतेने मतदान केले, तर राष्ट्रवादीचे सहा सदस्य आणि सरपंच अशी एकूण सात मते माळवे यांना मिळाली. एकूण या निवडणुकीत सदस्यांमध्ये कुठलीही फाटाफूट झाली नाही.
निवडणूक निरीक्षक म्हणून सहायक अभियंता दिनकर बंड यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी बी. डी. नाडेकर आणि कामगार तलाठी साळवे यांनी त्यांना या कामी मदत केली. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला.
Web Title: BJP’s Santosh Bansode as deputy sarpanch of Rajur