Home क्राईम चिट्ठी लिहून आत्महत्या करील अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भाड्याची खोली...

चिट्ठी लिहून आत्महत्या करील अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भाड्याची खोली घेत

Sexually abused: धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन भाड्याची खोली घेऊन लैंगिक अत्याचार (Raped) केल्याची घटना.

minor girl was raped by threatening to commit suicide by writing a letter

जळगाव: माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या नावाची चिट्ठी लिहून आत्महत्या करील अशी धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन भाड्याची खोली घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पिडीत १७ वर्षीय युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने संशियीत तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशनगर तांडा (ता. एरंडोल) येथील १७ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथील जोगेश्वरीनगर येथे गेले असता त्यांना ही युवती व दिनेश बाबूलाल पवार हा एका खोलीमध्ये आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही एरंडोल येथे आणले असता पीडित युवतीने आपबीती पोलिसांना दिली.

दिनेश याने माझ्याशी लग्न कर अन्यथा मी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी दिली. घरात याबाबत कोणासही सांगायचे नाही, असे देखील धमकावले. ३ ऑक्टोबरला संशयित दिनेशने पीडितेस औरंगाबाद येथे नेले. जोगेश्वरीनगरमध्ये भाड्याची खोली घेऊन अत्याचार केले. याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दिनेश पवार याच्याविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

Web Title: minor girl was raped by threatening to commit suicide by writing a letter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here