Home अहमदनगर अहमदनगर: रेमडेसिवीरचा काळा बाजार, दोघांना अटक, डॉक्टर फरार

अहमदनगर: रेमडेसिवीरचा काळा बाजार, दोघांना अटक, डॉक्टर फरार

Black market of Remdesivir injection

अहमदनगर:  सोमवारी रात्री पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी परिसरातील म्हस्के हॉस्पिटल येथे छापा टाकत रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्रसाद दत्तात्रय अल्हाट वय २७ रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर व रोहित अर्जुन पवार वय २२ साकत ता. नगर असे  अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या कारवाईत ७२ हजार ६०० रुपयांचा इंजेक्शन साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी जावेद हुसेन शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यामधील डॉ. कौशल्या किशोर म्हस्के व डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के रा. भिंगार हे दोघे जण फरार झाले आहेत.

म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमध्ये रेमडेसिवीरचा इंजेक्शनची जास्त किमतीने विक्री होत असल्याचे भिंगार पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने छापा टाकून अन्न औषध अधिकाऱ्यांना माहिती देत ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Black market of Remdesivir injection

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here