धक्कादायक! मदतीच्या बहाण्याने अंध पती समोर अंध पत्नीवर तीन वेळा अत्याचार
Akola Crime: अकोला येथे मुलीला भेटीला जात असलेल्या अंध पती-पत्नीला मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोर त्याच्या पत्नीवर अत्याचार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अकोला : अकोला येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अंध पती पत्नीला मदत करण्याच्या बहाण्याने पतीचा गळा दाबून त्याच्या अंध पत्नीवर तीन वेळा अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी नराधम आरोपीस अटक करण्यात आली आहे. सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाम रसूल शेख मतीन (वय २६, रा. सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) आरोपीचे नाव आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस त्याची कोठडीची मागणी करणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा भागात हे पीडित अंध दाम्पत्य राहतात. हे दोघेही जन्मतःच आंधळे आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. त्यांची मुलगी ही लहानपणापासूनच अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथे आजीकडे राहते.
आपल्या मुलीच्या भेटीला हे दोघे दाम्पत्य ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता परतवाडा बस स्थानकावरून अकोल्यात येण्यासाठी निघाले. रात्री पावणेआठ वाजता अकोल्या मध्यवर्ती बस स्थानकावर त्यांची बस आली. येथून वाडेगावला जाण्यासाठी जुन्या बस स्थानकावरून दुसरी बस लागते. या बस स्थानकाचा पत्ता विचारण्यासाठी त्यांनी एका गुलामयाला मदत मागितली. त्याने दोघांना जुन्या बस स्थानकावर आणले. स्थानकाच्या चौकशी वाडेगाव बस संदर्भात विचारले असता बस पंक्चर असल्यामुळे अर्धा तास उशीर लागणार अशी माहिती देण्यात आली.
ही बाब अंध महिलेने तिच्या आईला फोनवरुन सांगितली. मात्र, दिग्रस परिसरात पाऊस सुरू आहे, तुम्हा दोघांना पोहोचायला उशीर होईल, त्यापेक्षा उद्या सकाळी या असं महिलेच्या आईने सांगितले. दोघांनीही रेल्वे स्टेशनवर थांबण्याचा निर्णय घेतला. आरोपी हे सर्व ऐकत होता. दरम्यान अंध दांपत्याने आरोपीला रेल्वे स्थानक कुठे आहे? यासंदर्भात विचारलं. यावेळी आरोपीने त्यांना रेल्वे स्थानकावर घेऊन जातोय. असे सांगून एक रिक्षा बोलावली आणि दोघांनाही सोबत घेऊन गेला.
त्यानंतर रिक्षा वाटेतच बंद पडली आणि त्याने पुढे जायला नकार दिला. दरम्यान, तिघे चालत स्टेशन कडे निघाले. रस्त्यात एका निर्मनुष्य ठिकाणी खुल्या मैदानात आरोपीने दोघांना नेत तिथे अंध महिलेला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत अंध महिलेवर अत्याचार केला. दरम्यान, पतीने विरोध केला असता त्याचा गळा दाबून पुन्हा महिलेला दूर नेत तिच्यावर तीन वेळा अत्याचार केला. रात्री बाराच्या नंतर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने दोघांनाही रिक्षात बसून रेल्वे स्थानकाकडे पाठवून दिले. दोघेही दिग्रसला दुसऱ्या दिवशी पोहोचले आणि सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जात या विषयी तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत बस स्थानक परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Web Title: Blind wife rape three times in front of blind husband on pretext of help
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App