Home ठाणे केस बारीक कापल्याने 13 वर्षीय मुलगा संतापला अन् 16व्या मजल्यावरुन उडी घेत...

केस बारीक कापल्याने 13 वर्षीय मुलगा संतापला अन् 16व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

Thane Crime News :  बारीक केस कापल्याने या मुलाने 16 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना.

Thane youth commits suicide by jumping 16th floor after excessive hair cut 

ठाणे: ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलाचे केस बारीक कापल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. बारीक केस कापल्याने या मुलाने 16 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. हा मुलगा 13 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की,  भाईंदर पूर्व परिसरात न्यू गोल्डन एरिया येथे सोनम इंद्रप्रस्थ नावाची इमारत आहे. या इमारतीच्या 16व्या मजल्यावर पाठक कुटुंबीय राहतात. यांचा 13 वर्षीय मुलगा शत्रुघ्न राजीव पाठक हा आठवीत शिकतो. शत्रुघ्न याच्या चुलत भावाने त्याला केस कापण्यास नेले. मात्र, त्याचे केस बारीक कापल्याने तो नाराज झाला. नाराज झालेल्या शत्रुघ्न याने घरी येताच टोकाचं पाऊल उचललं. शत्रुघ्न हा अल्पवयीन होता आणि त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण पाठक कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

जास्त बारीक केस कापल्याने शत्रुघ्न खूपच नाराज झाला होता. त्याला कुटुंबीयांनी समजावले मात्र, नाराज झालेल्या शत्रुघ्न याने मंगळवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास 16व्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे तपास करत आहेत.

Web Title: Thane youth commits suicide by jumping 16th floor after excessive hair cut 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here