उसाच्या शेतात आढळला मृतदेह, खून केला असल्याची प्राथमिक माहिती
राहुरी | Murder Case Suspect: राहुरी तालुक्यातील धानोरे शिवारात विष्णू दिघे या या व्यक्तीचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला. ही घटना खून झाला असल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळी धानोरे शिवारात उसाच्या शेतातील बांधाजवळ ही घटना उघडकीस आली. विष्णू यांच्या डोक्यात जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षिका दिपाली काळे, श्रीरामपूर विभागाचे उप अधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक मधुकर शिंदे व पोलीस पथकाने भेट दिली आहे. सोमवारी रात्री मृतदेह शवविचेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी पोलीस पथक सखोल चौकशी करत आहे.
Web Title: Bodies found in sugarcane field Murder Case Suspect