Home कर्जत माझी वसुंधरा अभियान: जिल्ह्यात या नगरपंचायतला दोन कोटी रुपयांचे बक्षीस

माझी वसुंधरा अभियान: जिल्ह्यात या नगरपंचायतला दोन कोटी रुपयांचे बक्षीस

My Earth Expedition Karjat Taluka Second

कर्जत | My Earth Expedition: नगरपंचायत कर्जतने माझी वसुंधरा १ मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. याची बक्षीस रक्कम म्हणून राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. या दोन कोटी रुपयांचा वापर येत्या वर्षभरात कर्जत शहराला पर्यावरण पूरक शहर म्हणून विकसित करण्याकरिता केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली आहे.

माझी वसुंधरा या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या या बक्षीस रकमेच्या सहायाने कर्जत शहरामध्ये सात हरित उद्याने, सुसज्ज अशी रोप वाटिका, रस्त्याच्या दुतर्फा सौरदिवे, शहरांमध्ये यापूर्वी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन, जुने आड बारव यांचे संवर्धन, माझी वसुंधरा अभियान दोन अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन इत्यादी गोष्टींसाठी खर्च केला जाणार आहे.

माझी वसुंधरा अभियान दोन मध्ये कर्जत नगरपंचायत संपूर्ण नागरिकांच्या सहभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवायचा आहे असा निर्धार मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: My Earth Expedition Karjat Taluka Second

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here