Home अकोले संगमनेर: बोलेरो दुचाकी अपघातात अकोलेतील एक जण मृत्यू

संगमनेर: बोलेरो दुचाकी अपघातात अकोलेतील एक जण मृत्यू

Bolero bike accident kills one in Akole

Sangamner | संगमनेर: संगमनेर येथून भाजीपाला विकून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याची दुचाकी व समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो यांची समोरासमोर धडक (Accident) झाल्याने शेतकऱ्याचा उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

भाऊसाहेब विठोबा दातीर रा. गणोरे ता. अकोले असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. भाऊसाहेब दातीर आपली प्लाटीना दुचाकीवरून संगमनेर येथे भाजीपाला विकून आपल्या गावी गणोरे कडे जात असताना राजापूर जवळे कडलग रस्त्यावर म्हसोबा जवळील पाण्याच्या टाकीजवळ संगमनेरच्या दिशेने जात असलेली महिंद्रा बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने भाऊसाहेब दातीर हे दुचाकीसह रस्त्यावर आदळले त्यात ते गंभीर जखमी झाले. बोलेरो या गाडीचा चालक आपली चार चाकी बाजूला लावून पळून गेला होता. गंभीर जखमी झालेल्या दातीर यांना संगमनेर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

याबाबत प्रवीण मालुंजकर रा. गणोरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बोलेरो गाडीच्या चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

Web Title: Bolero bike accident kills one in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here