Home अहमदनगर विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Accident Contract worker dies of electric shock

Kopargaon Accident | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारामध्ये खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज रोहित्रावर चढलेल्या समाधान संतोष शेलार या कंत्राटी वीज कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

मयत समाधान शेलार हे कोपरगाव शहरातील जुना टाकळी नाका रहिवासी असून तो कोपरगाव वीज वितरण कंपनीमध्ये ग्रामीण विभागात गेल्या कंत्राटी कामगार म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षापासून कार्यरत आहे. खंडित केलेला वीजपुरवठा बिल भरल्यानंतर पूर्ववत करण्यासाठी शेलार कार्यक्षेत्रात गेले होते. खंडित रोहित्रावर शेलार वीज पुरवठा पूर्ववत करीत असताना अचानक वीज पुरवठा सुरु झाल्याने काही कळण्याच्या आत शेलार यांचा भाजून मृत्यू झाला.

Web Title: Accident Contract worker dies of electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here