Home अहमदनगर अहमदनगर: विवाहितेची आत्महत्या, गुन्हा दाखल

अहमदनगर: विवाहितेची आत्महत्या, गुन्हा दाखल

Shrirampur Marital suicide, crime filed

Shrirampur Crime | श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे एका विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या माहेरच्यांनी २५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी पती, सासू सासरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी अभिजित भोसले वय १८ हिने ३० डिसेंबरला विषारी औषध प्राशन केले होते. तिला उपचारासाठी श्रीरामपूरच्या साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असता ३१ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान तिचे निधन झाले. हॉस्पिटलच्या पत्रावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती. पुढील तपास सुरु करण्यात आला. मयताचे नातेवाईक साधन दीपक थोरात रा. पुणतांबा यांनी २५ फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून पती अभिजित भोसले, सासू अनिता रावसाहेब भोसले, सासरे रावसाहेब नारायण भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास खाडे हे करीत आहे.

Web Title: Shrirampur Marital suicide, crime filed 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here