Home क्राईम चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून

Husband muder wife by throwing stones at her

चाळीसगाव | Jalgavon: मद्यपी पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. काल २६ फेब्रुवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  शहरातील बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे.

चाळीसगाव येथील बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात  राहणाऱ्या प्रकाश उर्फ भुरा सोनवणे (वय ४०, रा. मुखेड ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) हा त्याची पत्नी मायाबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरुन पती- पत्नीत २६ फेब्रुवारीच्‍या रात्री अकरा ते बाराच्या सुमारास भांडण झाले. या वादात प्रकाश उर्फ भुरा याने पत्नी मायाबाईच्या डोक्यात दगड टाकला. गंभीर जखमी झाली, मायाबाईला तातडीने रुगणालयात दाखल केले मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

Web Title: Husband muder wife by throwing stones at her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here