Home संगमनेर संगमनेर तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणारी बोलेरो  जप्त

संगमनेर तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणारी बोलेरो  जप्त

Bolero seized in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत अवैध रीत्या दारूची वाहतूक करणारी पिक पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी ९:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.

या कारवाईत तब्बल दारूचे २८ बॉक्स जप्त करण्यात आले आहे.  एकूण  सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर अवैधरीत्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विभागीय पथकाचे अधिकारी दिगंबर शेवाळे यांना समजली होती. हि माहिती समजताच त्यांच्या पथकाने या गाडीचा पाठलाग करून सदर गाडी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर मंगळवारी साडे नऊ वाजेच्या सुमारास पकडण्यात आली. या गाडीची तपासणी केली असता दारूचे २८ बॉक्स जप्त करण्यात आले. सुमारे एक लाख ८७ हजार रुपयांचा माल व एक बोलेरो पिकप असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे.  

Web Title: Bolero seized in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here