Home संगमनेर संगमनेरात दोन गटांत तुफान हाणामारी, आठ जणांवर गुन्हा दाखल  

संगमनेरात दोन गटांत तुफान हाणामारी, आठ जणांवर गुन्हा दाखल  

Storm fighting between two groups at Sangamner  

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे उसने पैसे देण्याघेण्याच्या कारणातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

या मारहाणीत शापिनखान शौकत पठान रा. उपासनी गल्ली संगमनेर हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत शापिनखान पठाण यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार आरोपी सलीम हजी, सोनू कुरेशी, मुस्तगीम कुरेशी, सकिम कुरेशी, काशीक अशीद कुरेशी अमीर असद कुरेशी, कालेजानद कुरेशी, अब्दुल समद कुरेशी यांच्यासोबत पठाण यांची उसने पैसेसंदर्भात देवाणघेवाण होती.

ही देवाणघेवाण मिटविण्यासाठी पठाण यांना वरील आरोपींनी मंगळवारी दुपारी दिल्ली नाका येथे बोलावून घेतले. यावेळी पठाण व वरील आरोपी यांच्यात वाद होऊन बाचाबाची झाली. यावेळी आरोपींनी गैरकायद्याची माणसे बोलावून पठाण यांना बेदम मारहाण केली. यावेळी काहींनी हत्याराचा वापर करीत पठाण यांना जबरी जखमी केले. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.

Web Title: Storm fighting between two groups at Sangamner  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here