थोरातांकडून राहणेचे कौतुक: ग्रामीण भागातील तरुणास संधी मिळाल्यास तोदेखील नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो
संगमनेर | Sangamner: भारतीय संघाने बेस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करून शानदार विजय मिळविला आहे. भारतीय संघाने अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात ही मालिका जिंकून आणली आहे.
अजिंक्य राहणेने संघ दुखापतीत ग्रासलेला असताना अशा परिस्थितीत संघाची धुरा हाती घेऊन ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या विजयामुळे अजिंक्य राहणे व सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. संगमनेर तालुक्याचे आमदार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अजिंक्य राहणेचे कौतुक केले आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जिंकणे व इतिहास रचणे हे अभूतपूर्व असून सर्व भारतीयांसाठी आणि संगमनेरवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. ग्रामीण भागातील तरुणास संधी मिळाल्यास तोदेखील नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो हे अजिंक्य राहणे यांनी जगाला दाखवून दिले आहे अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी अजिंक्य राहणेची कौतुक केले आहे.
Web Title: Appreciation for Ajinkya Rahane from Thorat