Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून

संगमनेर तालुक्यात चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून

Murder of a woman with intent to steal in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner:  संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात अज्ञात चोरट्याने दागिने लुटण्याच्या आलेल्या उदेशाने महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी  भरदिवसा दीड वाजेच्या सुमारास घडली.

सावित्राबाई मोगल शेळके असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. कौठे कमळेश्वर गावात संगमनेर रस्त्याच्या कडेला सावित्राबाई मोगल शेळके या राहत होत्या. घराजवळच गोळ्या बिस्कीट चे दुकान आहे. तिचा शिवणकाम हा व्यवसाय होता, सावित्राबाई मंगळवारी दुपारी एकट्याच घरात असताना अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने सदर महिलेचा गळा दाबून खून केला.

शेजारीच राहत असणारी एक पाच वर्षाची मुलगी गोळ्या घेण्यासाठी आली असता हा सर्व प्रकार तिने बघितला.  चोरट्याने त्या बालिकेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडले.  जखमी झालेली मुलगी घराकडे रडत आली तोपर्यंत अज्ञात चोरटा पसार झालेला होता.

स्थानिक रहिवासी यांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना दिसून आला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,  श्रीरामपूर अतिरिक्त  पोलीस अधीक्षक दिपाली काळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार अधिक तपास करीत आहे.

Web Title: Murder of a woman with intent to steal in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here