Home अहमदनगर आई वडिलांवर मुलाने केला हल्ला, आईचा मृत्यू तर वडील अत्यवस्थ

आई वडिलांवर मुलाने केला हल्ला, आईचा मृत्यू तर वडील अत्यवस्थ

boy attacked the mother and father mother murder

शिरूर कासार | अहमदनगर | Murder: आई वडिलांच्या नात्याला काळीमा फसणारी घटना शिरूर कासार जि. बीड तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे घडली. विकृत मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांना काठीने अमानुष मारहाण करीत प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. यात आईचा मृत्यू झाला तर वडील अत्यवस्थ अवस्थेत आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सदर घटनेचा विडीयो रविवारी सकाळी व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वनाथ खेडकर वय ७५ व त्यांची पत्नी शाहुबाई खेडकर वय ७० हे आपल्या मुलासह शेतात राहत होते, त्यांना दादासाहेब त्र्यंबक खेडकरवय ४५ या मुलाने शनिवारी साडे चार वाजेच्या सुमारास काठीने अमानुष मारहाण केली. आई वडिलांना काठीने जबर मारहाण करताना त्यांच्या केविलवाण्या हाका सुद्धा तरी विकृत मुलाला पाझर फुटला नाही.

जखमी आई वडिलांना स्थानिकांनी अगोदर पाथर्डी व नंतर अहमदनगर येथे उपचारासाठी पाठविले. मात्र आईचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. वडिलांवर उपचार सुरु आहेत. या घटनेचा पंचनामा करून आईचा खून करणाऱ्या मुलाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दरम्यान सततच्या त्रासामुळे त्याचे आई वडील देखील मुलीकडे असतात.मात्र मुलाला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. म्हणून ते मायेपोटी भेटायला आले होते. मुलाच्या या विकृत स्वभावामुळे पत्नी व मुले जवळ राहत नाही. त्याची पत्नी मुलाला घेऊन माहेरी राहत आहे.

Web Title: boy attacked the mother and father mother murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here