Home अहमदनगर खासगी सावकारवर गुन्हा दाखल

खासगी सावकारवर गुन्हा दाखल

Filed a crime against a private lender

पारनेर | Crime News: पारनेर तालुक्यातील निघोज येथील एकावर खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नवनाथ लंके यांनी बाबाजी गयाजी लंके रा. निघोज यांच्या विरोधात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून बेकायदा सावकारकी केल्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निघोज येथील नवनाथ लंके यांना बाबाजी लंके यांनी २०१९ मध्ये त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर पुढील १८ त्यांना दरमहा अडीच हजार अदा केले. व्याज वाढतच असल्याने नवनाथ लंके यांनी पूर्ण रक्कम एक रकमी देतो. काहीतरी रक्कम कमी करा अशी मागणी सावकाराकडे केली. परंतु त्यास सावकाराने नकार दिला. त्यानंतर नवनाथ लंके यांच्याकडे पैशासाठी सतत तगादा लावला. व्याजाने रक्कम घेणारे नवनाथ यांनी एका मध्यस्थीमार्फत सावकाराकडे व्याजाचे पैसे कमी करण्याचे साकडे घातले. परंतु त्यास सावकाराने नकार दिला. असे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानंतर नवनाथ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे करीत आहे.  

Web Title: Filed a crime against a private lender

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here