Home Accident News Accident: कंटेनरच्या अपघातात मुलगा टायरखाली सापडुन मृत्यू तर आई जखमी

Accident: कंटेनरच्या अपघातात मुलगा टायरखाली सापडुन मृत्यू तर आई जखमी

Boy dies after being found under tire in container accident

अहमदनगर | Ahmednagar: कंटेनरच्या अपघातात (Accident) मुलगा जागीच ठार झाला तर आई गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  नगर- औरंगाबाद महामार्गावर शेंडी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला.

बाबासाहेब काशिनाथ टेकाळे ( वय 40 रा. बीड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांची आई झुंबराबाई काशिनाथ टेकाळे (वय 65) या जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पिंपळगाव माळवी येथील मेहेर बाबाच्या दवाखान्यामध्ये हे मायलेक गेले होते. तेथून परतत असताना उभ्या असलेल्या कंटेनरच्या सावलीला हे माय लेक बसलेले असताना  कंटेनर चालकाने कंटेनर सुरू करून पुढे घेतल्याने मुलगा कंटेनरच्या टायरखाली सापडुन त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला तर आई झुंबराबाई हिच्या पायावरून कंटेनर गेल्याने ती जखमी (injured) झाली आहे.

Web Title: Boy dies after being found under tire in container accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here