Home अहमदनगर अहमदनगर:  अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

अहमदनगर:  अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

Ahmednagar Unnatural acts with a minor

अहमदनगर  | Ahmednagar:  अल्पवयीन चार वर्षीय मुलाला घरामध्ये घेऊन जात त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य (Unnatural act) केल्याची घटना अहमदनगर शहरातील एका उपनगरात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय 55 मुळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी घरामध्ये स्वयंपाक करत असताना मुलाने त्यांच्याकडे पाच रूपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी पाच रूपये देताच मुलगा घराच्या खाली असलेल्या किराणा दुकानात गेला. 10 ते 15 मिनिटे होऊन देखील मुलगा परत न आल्याने फिर्यादी यांनी त्याचा घराच्या खाली शोध घेतला असता तो मिळून आला नाही. फिर्यादी यांना एका महिलेने सांगितले की, तुमच्या मुलाला सोनार बाबा घेऊन गेला आहे, तेव्हा फिर्यादी सोनार बाबाच्या घरी गेल्या असता सोनार बाबा मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा प्रकार समोर आला.

दरम्यान अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍या सोनार बाबाला स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मारहाण करणार्‍यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलाच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोनार बाबाविरूध्द अनैसर्गिक अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करीत आहेत. तर सोनार बाबाच्या मृत्यूमुळे मारहाण करणार्‍यांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Ahmednagar Unnatural acts with a minor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here