Home क्राईम महाराष्ट्र हादरला! प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार करुन निर्घृण हत्या

महाराष्ट्र हादरला! प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार करुन निर्घृण हत्या

Murder News:  प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली.

boyfriend took his girlfriend to the forest and brutally murder her by stabbing her 35 times

टिटवाळा: दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने  तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज तो हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात फेकत होता. दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण ग्रामीण हद्दीत ही भयानक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार करुन निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे.  

कल्याण ग्रामीण हद्दीत येणाऱ्या टिटवाळा येथील गोविली जंगलात ही घटना घडली. प्रेयसीवर 35 वार करुन तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. जयराम चौरे असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याने मित्राच्या मदतीने प्रेयसी रुपांजली जाधव हीची निर्घृण हत्या केली आहे.

या प्रकरणी अवघ्या २४ तासात कल्याण तालुका पोलिसांनी जयराम आणि यात त्याला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या दोघांचे विवाहबाह्य संबध होते. रुपांजली ही विवाहित होती.  ती पुण्यात राहत होती. आरोपी देखील पुण्यात राहत असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर नंतर प्रेम संबंधांमध्ये झाले. रूपांजली जयरामकडे सातत्याने लग्नाचा तगादा लावत होती. यामुळेच जयरामने तिची हत्या करण्याचा कट रचला.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

जयरामने रुपांजलीला टिटवाळा येथे भेटायला बोलावले. मला जंगलात सोने सापडले असून तू पण चल असे सांगून त्याने तिला गोविलीच्या जंगलात नेले. येथेच जयरामने मित्राच्या मदतीने रुपांजलीवर धारधार श्सत्राने सपासप वार करुन तिची निघृण हत्या केली आणि जंगलातच तिचा मृतदेह फेकून फरार झाला.

दरम्यान, स्थानिकांना रुपांजलीचा मृतदेह (Dead body) आढळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. अवघ्या काहींच तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या, पोलीसांनी दोघांना अटक (Arrested) केली आहे.

Web Title: boyfriend took his girlfriend to the forest and brutally murder her by stabbing her 35 times

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here