Home अकोले भंडारदऱ्यात पावसाची संततधार कायम; पर्यटकांची भंडारदरा परिसरात गर्दी

भंडारदऱ्यात पावसाची संततधार कायम; पर्यटकांची भंडारदरा परिसरात गर्दी

भंडारदरा: भंडारदरा धरणावर कालपासून पावसची संततधार सुरू असून त्यामूळे पर्यटकांनी भंडारदरा परिसर फुलून गेला आहे. आज दिवसभरात भंडारदरा येथे फक्त १७ मीमी पावसाची नोंद झाली. धरणाचा पाणीसाठा ४४४४ दलघफु झाला असल्याची माहिती भंडरदरा धरण शाखेकडून मिळाली आहे.

धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर कमीच आहे. पावसाच्या तुरळक सरी कोसळत असुन या कोसळणाऱ्या सरींचा आनंद घेण्यासाठी भंडारदऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली. अनेक धबधबे वाहते झाले असल्याने भंडारदऱ्याच्या रिंगरोडला पर्यटकांची जास्त रेलचेल आहे. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढच होत असून आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठी ४४४४ दलघफु झाला आहे. गत चोविस तासात भंडारदरा येथे २६ मीमी पाऊस झाला असून घाटघर येथे २६ मीमी पाऊस झाला आहे. रतनवाडी ३१मीमी, पांजरे ३३मीमी तर वाकी येथे ९ मीमी पाऊसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरणात शनिवारी दिवसभरात ७० दलघफु नविन पाणी आले आहे. वाकी धरण पूर्ण क्षमतेन भरलेले असून कृष्णवंती नदीही वाहती झाल्याने निळवंडे धरणातही पाण्याची चांगली आवक असुन शनिवारी संध्याकाळ पर्यंत या धरणामध्ये १६०४ दलघफु पाणी जमा झाले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यावर शाखाधिकारी अभिजित देशमुख यांच्यासह वसंत भालेराव, प्रकाश चव्हाण, बाळु लोहगावकर, मंगळा मधे, सुरेश हंबीर, प्रकाश उघडे, पांडू झडे, तुकाराम घोरपडे, चंद्रकांत भगत हे कर्मचारी सतत लक्ष ठेऊन आहेत.

Website Title: Breaking News: Rainfall Remains Stable In Bhandari; Crowd Of Tourists

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here