Home अकोले अकोले: मुख्याध्यापक संघाचा उपक्रम विदयार्थ्यांना प्रेरणा देणारा- आ.डॉ.तांबे

अकोले: मुख्याध्यापक संघाचा उपक्रम विदयार्थ्यांना प्रेरणा देणारा- आ.डॉ.तांबे

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी –विदयार्थ्यांनी प्रचंड जिद्द मनात बाळगावी, त्यासाठी खूप कष्ट घ्यावेत. मोठी स्वप्न पाहा, जीवनात खुप मोठे व्हा. यासाठी प्रेरणा म्हणून मुख्याध्यापक संघाचा उपक्रम विदयार्थ्यांना प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार आ.डॉ. तांबे यांनी काढले.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अकोले यांच्या वतीने दहावी व बारावीमधील गुणवंत विदयार्थी तसेच सेवानिवृत मुख्याध्यापक यांचा सत्कार आ.डॉ. तांबे यांच्या हस्ते पार पडला, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार किशोर दराडे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल पंडित, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, चिटणीस संजय लहारे, तालुकाध्यक्ष सुनिल धुमाळ, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष भास्कर कानवडे, सुनिल वाळुंज, जि.प. सदस्य जालिंदर वाकचौरे, बाजीराव दराडे, अनिताताई मोरे, महेशराव नवले, डॉ.मनोज मोरे, गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश पावसे, प्राचार्य तुकाराम कानवडे, मनोहर लेंडे, अंतुराम सावंत,एस.के. कचरे, विलास महाले, माधव बंगाळ चांगदेव खेमनर, अनुराधा पोखरकर, सुभाष चासकर, गोरक्ष वाकचौरे, दशरथ फापाळे, कुंडलिक काळे, संपत जाधव, अरूण कोते, तुषार गायकर यांसह तालुक्यातील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.डॉ. तांबे म्हणाले, जीवनात जी माणसे उच्च पदांवर पोहचले ते सर्व ग्रामीण भागातून पुढे गेले आहेत. यामध्ये मराठी माध्यमांच्या शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडण्याचे शासनाचे षडयंत्र असल्याने शिक्षकांना ज्ञानदानाचे कार्य करताना खिचडीबरोबरच भाकरी देखील थापाव्या लागणार असल्याची खंत व्यक्ती केली.
आमदार दराडे म्हणाले, २००५ सालानंतर शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी आम्ही सर्व शिक्षक आमदार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरून आहोत. त्यासाठी सर्व आमदार दिल्लीला जाऊन आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मधुकरराव नवले, सुनिल पंडीत, विनोद हांडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व स्वागत सुनिल धुमाळ यांनी केले. सुत्रसंचालन रामदास कासार यांनी केले. तर गोरक्ष आवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Website Title: Latest News motto of the Headmaster’s team inspires dr Tambe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here