हिवरगाव आबंरे: वृक्षरोपण कार्यक्रम सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला
हिवरगाव आबंरे: वृक्षरोपण कार्यक्रम सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक 13जुलै 2019 रोजी सकाळी 10:00 वाजता हिवरगाव आबंरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर याठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री अंकुश वाकचौरे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर फापाळे शिवसेना तालुका अध्यक्ष माननीय श्री मच्छिंद्रशेठ धुमाळ तसेच सामाजिक नेते माननीय श्री रोहिदास चव्हाण तसेच अकोला तालुक्याचे नगरसेवक माननीय श्री प्रमोदजी मंडलिक व म्हांळादेवीच्या सरपंच श्री प्रदीप हासे व अकोले शहर शिवसेनेचे अध्यक्ष श्री नितीन नायकवाडी व अकोले तालुक्यात शिक्षण विभाग प्रमुख ढगे सर व विष्णू कणिॕक अकोले तालुक्याच्या पंचायत समितीचे सदस्य श्री संत नामदेव आबंरे प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच हिवरगाव मधील सरपंच सौ बेबीताई जालिंदर आबंरे तसेच ग्रामसेविका सौ जे डी रहाणे मॅडम व तलाठी सौ ढगे ताई मॕडम व सदस्य सौ नाजमा पटेल माजी सरपंच सौ संगीता रेवगडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री पारधी सर व शिक्षक श्री रवी रुपवते सर तसेच व
सौ ठुबे मॅडम तसेच वाकचौरे सर आबंरे सर तसेच न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक श्री डी डी वाकचौरे व शिक्षक उपस्थित होते तसेच गावातील ज्येष्ठ नेते व तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख माननीय श्री मच्छिंद्रशेठ धुमाळ यांनी भाषणात सांगितले मागील वर्षी खासदार निधीतून गावाला एक सभामंडप दिला व यावर्षी खासदार निधीतून जिल्हा प प्राथमिक शाळेसाठी संगणक प्रोजेक्ट तसेच माळवस्तीसाठी पाण्याची टाकी व मुस्लिम बांधवांसाठी स्मशानभूमीसाठी हॉय मेक्स व धामोडी फाटा या ठिकाणी मशिदीला एक हॉयमेक्स खासदार निधीतून दिला जाईल अशी घोषणा तालुकाप्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ यांनी सांगितले.
त्यानंतर अहमदनगर जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व इयत्ता चौथी व दहावी या विद्यार्थ्यांच्या प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन वृक्ष भेट देऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला अशाप्रकारे वृक्षरोपण कार्यक्रम साजरा झाला या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री अंकुश वाकचौरे यांनी गावातील सर्व ग्रामस्थांच्या आभार मानले.
Website Title: Latest News Plantation Program Function at Hivargaon Ambare