Home अहमदनगर शिर्डी: एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्यानं शिर्डी हादरली खुन्यास अटक

शिर्डी: एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्यानं शिर्डी हादरली खुन्यास अटक

Latest News:

शिर्डी: आज दिनांक १३ जुन शनिवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्यामुळे शिर्डी हादरली आहे. त्याचबरोबर याच कुटुंबातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर संस्थान रुग्णालयात उपचार चालू आहेत. निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या  अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून या हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आज सकाळी साडे सहाच्या सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीची देखील कोयत्यानं हत्या केली. पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर वय ३५ वर्ष) आणि तावू ठाकूर वय १८वर्षे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.

Website Title: Latest News shirdi Tripal Murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here