कॉंग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते संपर्कात: राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीला वैतागलेले अनेक विद्यमान आमदार आपल्यामार्फत भाजपा सेना युतीत प्रवेशासाठी संपर्कात आहे. कॉंग्रस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासंदर्भात अनेक विद्यमान आमदारांच्या मनामध्ये खदखद आहे. हि खदखद केव्हाही बाहेर पडू शकते परंतु कॉंग्रस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील बड्या नेत्यांना भाजपा सेना युतीत घेण्यासंदर्भात अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठींचा असेल असा गौप्यस्फोट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
आषाढी वारीनंतर विखे पाटील यांच्याशी येथील शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विखे पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा समाजाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त करून हा मराठा समाजाचा विजय असल्याचा ते म्हणाले.
Website Title: Todays breaking news in Marathi Radhakrishna Vikhe Patil speech