शालार्थ आयडीसाठी अधिकाऱ्याच्या नावाने मागितली दोन लाखांची लाच
Solapur: तालुक्यातील एका शिक्षकाने शालार्थ आयडीसाठी दोन शिक्षकांकडून प्रत्येकी एक लाख असे दोन लाख रूपये लाचेची (Bribe) मागणी केल्याचे सिद्ध, बार्शीतील शिक्षकावर गुन्हा दाखल.
सोलापूर : सोलापुरात शालार्थ आयडी न मिळाल्याने एका खासगी शाळेतील शिपायाने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना सोमवारी (दि. १४) दुपारी बार्शी तालुक्यातील एका शिक्षकाने शालार्थ आयडीसाठी दोन शिक्षकांकडून प्रत्येकी एक लाख असे दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सचिन प्रकाश उकिरडे (लोकसेवा विद्यालय, आगळगाव, ता. बार्शी) असे लाच मागणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सचिन उकिरडे याने विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, पुणे विभाग यांचेशी तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेशी संबंधीत दोन शिक्षकांचे शालार्थ आयडीच्या अनुषंगाने बोलणे झाल्याचे सांगुन, औदुंबर उकिरडे यांच्यासाठी तक्रारदार शिक्षक संघटनेतील एका शिक्षकाच्या शालार्थ आयडीच्या केलेल्या कामाचा मोबदला व एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे काम करण्यासाठी म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये असे २ लाख रुपये लाचेची मागणी केली. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षक सचिन उकिरडे याच्याविरुध्द बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत माळी, पोलीस अंमलदार सायवण्णा कोळी, शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, रवि कटखिळे, समके, चालक गायकवाड, शाम सुरवसे या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: bribe of two lakhs was demanded in the name of the officer for school ID
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App