Home संगमनेर संगमनेरात टवाळखोर, बेधुंद वाहन चालकांची चलती, बेधुंद वाहन चालकांविरोधात कारवाई

संगमनेरात टवाळखोर, बेधुंद वाहन चालकांची चलती, बेधुंद वाहन चालकांविरोधात कारवाई

Sangamner News: नाशिक-पुणे महामार्गावर बेधुंदपणे वाहन चालविणाऱ्या विरुद्ध संगमनेर शहर पोलिसांची कारवाई.

Movement of vagrants, reckless drivers in Sangamner

संगमनेर : संगमनेर शहरात टवाळखोर, बेधुंद वाहन चालकांची संख्या वाढली आहे. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.  येथील नाशिक-पुणे महामार्गावर बेधुंदपणे वाहन चालविणाऱ्या विरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी काल दुपारी कारवाई केली. महामार्गावरील सह्याद्री कॉलेज परिसरात शहर पोलिसांनी अचानक वाहन तपासणी मोहीम राबविली.

यावेळी टवाळखोर, बेधुंद वाहन चालविणारे लहान मुले, त्याचप्रमाणे विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्वतः या कारवाईत सहभाग घेतला. सुमारे तासभर केलेल्या कारवाईत विविध वाहनांवर कारवाई केली. नाशिक-पुणे महामार्गावर विविध महाविद्यालय आहेत. यामुळे या रस्त्यावर विद्याथ्र्यांची नेहमी गर्दी असते, अनेक जण या रस्त्यावर बेधुंदपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघात घडत असतात. याला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबविली.

दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर, अकोले नाका या परिसरात बेदाराकपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडली आहे. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला लागणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.

Web Title: Movement of vagrants, reckless drivers in Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here