Home क्राईम लाच घेणारा जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

लाच घेणारा जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Crime News: सॉफ्टवेअर कंपनी चालविणाऱ्या एका उद्योजकाकडे पाच हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या केंद्रीय जीएसटी विभागाच्या निरीक्षकाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला.

Bribe-taking GST officer in CBI net

मुंबई : नागपूर येथे सॉफ्टवेअर कंपनी चालविणाऱ्या एका उद्योजकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय जीएसटी विभागाच्या निरीक्षकाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अमित कुमार असे या जीएसटी निरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  संबंधित उद्योजकाच्या जीएसटी क्रमाकांची पडताळणी करण्यासाठी अमित कुमार हा उद्योजकाच्या घरी गेला व त्याच्याकडे काही कागदपत्रांची त्याने तपासणीसाठी मागणी केली. त्यानंतर त्याच्याकडून एक फॉर्मही भरून घेतला. दुसऱ्या दिवशी संबंधित उद्योजक हा अमित कुमार कार्यालयात आवश्यक कागदपत्रे घेऊन भेटला. या भेटीदरम्यान अमित कुमार याने या उद्योजकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली व हे पैसे दिल्यानंतर त्याच्या जीएसटी क्रमांकाची पडताळणी पूर्ण करू असे सांगितले. यानंतर या उद्योजकाने सीबीआयकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे सीबीआयने अमित कुमार याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Bribe-taking GST officer in CBI net

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here