Jalgaon News: खुनाच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेल्या एका कैद्यावर त्याच्या बराकीत असलेल्या इतर कैद्यांनी अनैसर्गिक अत्याचार (unnatural abused) केल्याची घटना.
जळगाव : जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेल्या एका कैद्यावर त्याच्या बराकीत असलेल्या इतर कैद्यांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या कैद्याच्या गळ्यावर धारदार पट्टीने वार करत, या घटनेची माहिती दिल्यास बंदीला ठार मारण्याचीही धमकी दिली आहे. या प्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा कारागृहात गेल्या काही महिन्यांपासून एका खुनाच्या गुन्ह्यात एक २६ वर्षीय संशयित आरोपी युवकाला ठेवण्यात आले आहे. तो युवक असलेल्या कारागृहातील एक व दोन बराकींमध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम व विजय ऊर्फ राणा दिलीप चव्हाण या
लोखंडी पट्टीने केले गळ्यावर वार
रात्री चौघांनीही अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर, त्याच दिवशी पहाटे पुन्हा तो युवक झोपलेला असताना, विकी शिंदे याने त्या युवकाला उठवूत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या युवकाने त्याला नकार दिला. तेव्हा चौघांनीही त्या युवकाच्या गळ्यावर लोखंडी पट्टीने वार करत, त्याला जखमी केले.
कैद्यांनादेखील ठेवण्यात आले होते. १२ जुलै रोजी २६ वर्षीय कैदी असलेल्या युवकाला बाथरूममध्ये घेऊन जात त्याच्यावर त्यांनी बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याला याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.
Web Title: Prisoner unnatural abused by four
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App