Home अहमदनगर अहमदनगर: महिला पोलिसाची लाचखोरी, जामीन मिळवून देण्यासाठी मागितली लाच

अहमदनगर: महिला पोलिसाची लाचखोरी, जामीन मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Ahmednagar News: जामीन मिळण्याकरिता मदत करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच (Bribe) स्वीकारताना पोलिस हवालदारास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Bribery of female police, bribe demanded to get bail

अहमदनगर:  आरोपी जामीन मिळण्याकरिता मदत करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारताना पोलिस हवालदारास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ज्योती मच्छिंद्र डोके (नेमणूक एमआयडीसी) असे गुन्हा दाखल झालेल्या परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, संदीप रावसाहेब खेंगट (रा. बाबुर्डी बेंद, नगर-दौंड रोड, ता. नगर) असे अटक केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरिक्षक डोके यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीला जामीन मंजुरीसाठी मदत करू व न्यायालयाने म्हणणे मागितल्यास लवकर देऊ. त्यासाठी पैशांची मागणी करत आठ हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाशिक येथील पथकाने सापळा लावून पोलिस हवालदार खेंगट यास लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याने हे पैसे पोलिस उपनिरिक्षक डोके यांच्या सांगण्यावरून घेतले. ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरिक्षक गायत्री म. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Bribery of female police, bribe demanded to get bail

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here