Home अहमदनगर अहमदनगर: अवकाळीचा कहर, वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

अहमदनगर: अवकाळीचा कहर, वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

Ahmednagar News:  शेतात काढून ठेवलेला कांदा झाकून जवळच असणार्‍या घराकडे निघालेल्या 45 वर्षी शेतकर्‍यावर वीज कोसळून (lightning strike) त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना.

Havoc of bad weather, death of farmer due to lightning strike

राहुरी | Rahuri:  जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या अवकाळीचा तडाखा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या अवकाळी पावसाचा फटका शेती मालासोबतच आता माणसांना, जनावरांना, घरांना बसण्यास सुरू झाली आहे.

गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास वांबोरी (ता. राहुरी) येथील संकेत फार्मजवळ भर वादळात शेतात काढून ठेवलेला कांदा झाकून जवळच असणार्‍या घराकडे निघालेल्या 45 वर्षी शेतकर्‍यावर वीज कोसळून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाऊसाहेब रघुनाथ गांधले असे मृत पावलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे गांधले या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने वांबोरी गावात शोककळा पसरली आहे. गुरूवार (दि.१३) रात्री ९ ते १० च्या दरम्यान विजांचा कडकडाट सुरू असल्यामुळे गांधले व त्यांचे बंधू तसेच भावजयी नगर रोडवर असणाऱ्या संकेत फार्मजवळ राहत्या घरासमोरच असणाऱ्या शेतामध्ये काढून ठेवलेले कांदे झाकण्याच्या प्रयत्नात होते.

यावेळी कांदे झाकून ठेवल्यावर जवळ असणाऱ्या घराकडे परतत असताना भाऊ आणि भावजयी घराच्या ओट्या पर्यंत पोहचले आणि त्यांच्या मागे अवघ्या २० फूट अंतरावर असताना जोरात वीज कडकडली व ती भाऊसाहेब गांधले यांच्या अंगावर कोसळली.

यामुळे गांधले यांच्या पाठीला मोठ्या प्रमाणात भाजल्याने जखम झाली. त्यांना तातडीने वांबोरीतील खाजगी रुग्णालयात आणले. यावेळी डॉक्टर यांनी तपासले असता त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याचे घोषित केले. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे गांधले कुटूंब गोंधळून गेले. घरातील कर्ता शेतकरी गेल्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

दरम्यान, गुरूवारी रात्री 9 ते 10 या दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळ झाले. या वादळात पावसापेक्षा विजांचा कडकडाट अधिक होता. कानठळ्या बसणार्‍या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.

नगरच्या सावेडी उपनगरात 40 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून नगर तालुक्यातील चास महसूल मंडलात 29.3 आणि कर्जतच्या भांबोरा मंडलात 20 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी रात्री झालेल्या वादळात कर्जत तालुक्यात शेतकर्‍यांच्या दोन गायी आणि जामखेड तालुक्यात एका म्हशीचा मृत्यू झाला असून दोन घरांची पडझड झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Havoc of bad weather, death of farmer due to lightning strike

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here