Home संगमनेर संगमनेर: म्हाळुंगी नदीवरील पूल खचला, वाहतुकीस बंद

संगमनेर: म्हाळुंगी नदीवरील पूल खचला, वाहतुकीस बंद

Sangamner News: साई मंदिर प्रवरा नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळुगी नदीवर असलेला पूल खचला.

bridge over Mhalungi river collapsed

संगमनेर: शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर प्रवरा नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळुगी नदीवर असलेला पूल खचला असल्याचे स्थानिक नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल तातडीने वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे.

संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईपलाईन या समतरी आहे आज दुपारच्या वेळी ही पाईपलाईन आणि यातील मोठ्या प्रमाणात फट निर्माण झाली असल्याचे दिसून आले

तसेच पूल देखील काही ठिकाणीच आहे अनेक दिवसापासून महाळुगी नदीत पाणी असल्याने पुलाच्या खाली असलेली समांतर पाईपलाईन

स्थानिक नागरिकांनी याची माहिती तातडीने नगरपालिका प्रशासनाला कळविली. घटनास्थळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले असून त्यानी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. तसेच पुलावरून समांतर गेलेल्या शहराच्या पिण्याच्या पाईपलाईनला कोणताही चौका पोहोचू नये यासाठी उपाय योजना सुरु केल्या आहे पुलावरून सुरू असलेली वाहतूक पुलाच्या दोन्ही बाजूने अडथळे टाकत बंद करण्यात आली. यामुळे परिसरातील पिंग स्टेशन, साईनगर घोडेकर मका या भागातील नागरिकांना दूरवरून शहरात ये-जा करावी लागणार आहे

तसेच साई मंदिरा शेजारी असलेल्या दिगंबर गणेश सराफ विद्यालय, ओहरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे देखील मोठे हाल होणार असून त्यांना देखील दूरवरून या ठिकाणी यावे लागणार आहे. त्यांची देखील ऐन परीक्षेच्या काळात तारांबळ उडणार आहे. शहरात पूल खचल्याचे वृत्त समजतात नागरिकांनी या परिसरात गर्दी केली होती.

दरम्यान या संदर्भात माहिती संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडी येथे येत परिस्थितीची माहिती घेतली. घटनास्थळी आलेल्या अधिकारी कर्मचान्यांना पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या तसेच या ठिकाणी माहितीचा फलक लावण्या संदर्भात त्यानी सूचना केल्या या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले असल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देऊन घटनास्थळी बोलावून घेण्यास त्यांनी संबंधितांना सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास लोणारी त्यांच्यासोबत उपस्थित होते

म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्यामुळे शहरातील नेहरू गार्डन आणि परदेश पूरा जल कुआ वरील झोनमध्ये उद्या (शुक्रवार) सकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे नगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. उद्या सायंकाळपर्यंत तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा प्रयत्न असला तरी नागरिकांनी पाणी काटकसरणी वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सगमनेर शहरातील साई मंदिराकडे जाणान्या रस्त्यावरील म्हाळूमी नदीवरचा पूल पूर्णपणे खचल्यामुळे पुलावरून जाणारी संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन तुटली आहे त्यामुळे संगमनेर शहरातील काही भागाला उद्या सकाळी पाणीपुरवठा होणार नाही

उद्या शुक्रवार (१४ ऑक्टोबर २०२२) सकाळी नेहरू गार्डन जलकुंभ संपूर्ण झोन पोलीस लाईन देवाचा मळा मेन रोड, मोमीनपुरा, तीन बत्ती चौक स्टेडियम जवळ अभंग मळा, पंजाबी कॉलनी, सावता माळी नगर, माळीवाडा, अशोक चौक इत्यादी परिसरात

तसेच परदेशपुरा टाकीवरील झोन, नाईकवाड पुरा, परदेश पूरा, घास बाजार, देवी गल्ली, जोर्वे रोड चौक, सस्यदबाबा चौक परिसर इत्यादी परिसर यांचा पाणीपुरवठा होणार नाही.

Web Title: bridge over Mhalungi river collapsed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here