Home अहमदनगर परप्रांतीय अल्पवयीन मुलीला आणून अत्याचार; नगर जिल्ह्यात खळबळ

परप्रांतीय अल्पवयीन मुलीला आणून अत्याचार; नगर जिल्ह्यात खळबळ

Breaking News | Ahmednagar: बिहार येथील अफताब नावाच्या १९ वर्षीय तरुणाने तेथीलच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून राहुरी येथे पळवून आणून  पीडित मुलीवर अत्याचार. (abused).

Bringing and abusing a migrant minor girl Excitement in Ahmednagar

राहुरी: नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.  बिहार येथील अफताब नावाच्या १९ वर्षीय तरुणाने तेथीलच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून राहुरी येथे पळवून आणले. पीडित मुलीवर अत्याचार होत असल्याचे समजताच काही लोक जमा झाले. त्यांनी संबंधित तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.  या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बिहार येथील अफताब नावाच्या तरुणाने तेथीलच एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला खोटीनाटी माहिती देऊन फूस लावून पळवून आणले. गेल्या तीन महिन्यांपासून तो त्या मुली बरोबर राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहत होता. या दरम्यान संबंधित तरुणाच्या नात्यातील दुसरा एक तरुण त्या पीडित मुलीवर अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने बिहार येथील बहिणीला फोन करुन सांगीतली. मुलीची बहिण काल १३ जानेवारी रोजी राहुरी येथील ब्राम्हणी गावात आली. मुलीने सर्व हकिगत तिच्या बहिणीला सांगितली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना समजली.

यावेळी परिसरातील शेकडो गावकरी जमा झाले. जमावाकडून संबंधित तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधिन केले. मुलीच्या नातेवाईकांनी मुलगी बिहार येथुन बेपत्ता झाल्याची तक्रार तेथील पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली. घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.

Web Title: Bringing and abusing a migrant minor girl Excitement in Ahmednagar

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here