Home अहमदनगर महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीची आत्महत्या, कॉलेज सुटले अन…

महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीची आत्महत्या, कॉलेज सुटले अन…

Ahmednagar News: अकरावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Jamkhed Suicide of a college student

जामखेड : शहरातील सदाफुलेवस्ती येथील अश्विनी आण्णा नेमाने (वय १७ ) या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अश्विनी नेमाने हि शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहे. आई वडील जामखेड शहरातील एका वीटभट्टीवर कामाला असतात. सकाळी दोघेही कामाला गेले असताना अश्विनी कॉलेजला गेली कॉलेज सुटल्यावर घरी आली घरातील घरकाम केले व नंतर घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. शुक्रवार दि.१२ रोजी सायंकाळी आई वडील घरी आल्यावर ही घटना लक्षात आली तेव्हा तीला ताबडतोब ग्रामीण रुग्णालय दाखल केले. पण तोपर्यंत ती मयत झाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप

समजले नाही. जामखेडचे वैद्यकीय अधिकारी शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मिळताच त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन घटना स्थळी घाव घेऊन या घटनेची माहिती घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढिल तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.

Web Title: Jamkhed Suicide of a college student

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here